विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठी आज “राजकीय विसंगत” दिवस आहे. एकीकडे विकसित आणि विकसनशील G20 देशांचे परराष्ट्रमंत्री भारतीय नेतृत्वाची सराहना करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी भारतात लोकशाही जिवंत नसल्याचे केंब्रिज मध्ये जाऊन सांगत आहेत.G20 Foreign Ministers Appreciate India’s Strong Leadership; Rahul Gandhi says in Cambridge that there is no democracy in India!!
G20 च्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण परिषद सध्या राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. त्यातच भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया जपान अशा “क्वाड” देशांची बैठक देखील रायसीना डायलॉगच्या निमित्ताने झाली. या रायसीना डायलॉगमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या तीनही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय नेतृत्वाची प्रशंसा केली. भारतीय नेतृत्वाखाली क्वाड देश आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कठोर भूमिका घेत आहेत.
त्या संदर्भात स्टॅंडर्ड ऑपरेशन मोड कसा असावा हे ठरवत आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात प्रगत आणि प्रगतिशील देशांची मजबूत साखळी तयार करण्याचे काम भारत स्वतःच्या नेतृत्वाखाली करत आहे, त्याला अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. इतकेच नाही, तर रशिया युक्रेन युद्धामध्ये भारतीय नेतृत्व मध्यस्थी करू शकते. भारताचे दोन्ही देशांशी मजबूत विश्वासार्ह संबंध आहेत, अशी ग्वाही देखील या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.
Our meeting today reaffirms the Quad’s steadfast commitment to supporting a free and open Indo-Pacific, which is inclusive and resilient: Joint Statement- Quad Foreign Ministers’ Meeting pic.twitter.com/66fmy36Tsg — ANI (@ANI) March 3, 2023
Our meeting today reaffirms the Quad’s steadfast commitment to supporting a free and open Indo-Pacific, which is inclusive and resilient: Joint Statement- Quad Foreign Ministers’ Meeting pic.twitter.com/66fmy36Tsg
— ANI (@ANI) March 3, 2023
पण एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे खासदार राहुल गांधी मात्र केंब्रिजमध्ये जाऊन भारतात लोकशाही जिवंत नसल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी पेगासस हेरगिरीचे उदाहरण दिले आहे. माझ्या मोबाईल फोन मध्ये पेगासन इन्स्टॉल आहे. मला अनेकदा त्या संदर्भात फोन आले होते. ते फोन टॅप केले गेले. भारतामध्ये विरोधकांमागे वेगवेगळ्या केंद्रीय तपास संस्था सोडून कारवाई सुरू आहे. विरोधकांचा आवाज अवैधरित्या बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतात लोकशाही जिवंत असण्याचे हे लक्षण नाही, असा आरोप राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केला आहे.
"I had Pegasus on my phone, Indian democracy under attack": Rahul Gandhi at Cambridge lecture Read @ANI Story | https://t.co/DpJwCfmgDa#RahulGandhi #Pegasus #Cambridge #democracy pic.twitter.com/kPiWC9L0Ft — ANI Digital (@ani_digital) March 3, 2023
"I had Pegasus on my phone, Indian democracy under attack": Rahul Gandhi at Cambridge lecture
Read @ANI Story | https://t.co/DpJwCfmgDa#RahulGandhi #Pegasus #Cambridge #democracy pic.twitter.com/kPiWC9L0Ft
— ANI Digital (@ani_digital) March 3, 2023
एकीकडे जी 20 देशांचे परराष्ट्र मंत्री भारतीय नेतृत्वाची सराहना करतात. त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी मुकाबला, ग्रीन टेक्नॉलॉजी, सोलर इनिशिएटिव्ह, वन ग्लोब अशा अभिनव संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे भारतात लोकशाही नाही, असा डांगोरा राहुल गांधी इंग्लंडमध्ये जाऊन पिटतात ही राजकीय विसंगती आज समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App