वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काँग्रेसच्या गांधी घराण्यावर निशाणा साधणाऱ्या ग्रुप २३ अर्थात जी – २३ चे नेते गुलाम नबी आझादांना काँग्रेस श्रेष्ठींनी अखेर काँग्रेसच्या कामात सामावून घेतले आणि त्यांना नवीन असाइनमेंट दिली. गुलाम नबींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी या टास्क फोर्सची घोषणा केली. ते स्वतः या टास्क फोर्सचे सदस्य आहेत.G-23 leader Ghulam Nabi gets new assignments; Establishment of Congress Corona Prevention Task Force under his chairmanship
या टास्क फोर्समध्ये जी – २३ मधले दुसरे नेते पवनकुमार बन्सल यांचाही समावेश आहे. पण अन्य नेते बंडखोर नेते यामध्ये समाविष्ट नाहीत. बऱ्याच दिवसांनी अंबिका सोनी यांचे नाव काँग्रेसच्या यादीत आले आहे. एकूण १३ सदस्यांच्या यादीत प्रियांका गांधी – वड्रा यांचे प्रमुख नाव आहे. याखेरीज मुकूल वासनिक, जयराम रमेश, रणजितसिंग सुरजेवाला, डॉ. अजय कुमार, पवन खेरा, मनीष छत्तर, गुरुदीपसिंग सप्पल, बी. व्ही. श्रीनिवास यांचा समावेश आहे.
गुलाम नबी आझाद हे यूपीए सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी टास्क फोर्सची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन, नियंत्रण करण्याचे काम हा टास्क फोर्स करणार आहे.
Congress sets up a 13-member COVID-19 Relief Task Force under chairmanship of former Union Health Minister Ghulam Nabi Azad to coordinate relief activities of the party pic.twitter.com/YCHwgdv5Gw — ANI (@ANI) May 11, 2021
Congress sets up a 13-member COVID-19 Relief Task Force under chairmanship of former Union Health Minister Ghulam Nabi Azad to coordinate relief activities of the party pic.twitter.com/YCHwgdv5Gw
— ANI (@ANI) May 11, 2021
या निमित्ताने गुलाम नबींसारख्या नेत्याला काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातले नसले, तरी सध्याच्या काळात चर्चेत राहू शकेल, असे महत्त्वाचे काम देण्यात आले आहे. हे काम देताना गुलाम नबींबरोबर जी – २३ मधील पवनकुमार बन्सय यांचाच फक्त विचार करण्यात आला आहे. याचा अर्थ बाकीच्या नेत्यांचा विचार सध्या तरी काँग्रेस नेतृत्व करणार नसल्याचा राजकीय सिग्नल पक्षाने दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App