विशेष प्रतिनिधी
लखनौ : मतासाठी काही पण करण्याची राजकारण्यांची तयारी असते. आता उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी बिहारच्या मंत्र्यांनी चक्क डाकु फुलनदेवी हिचे पुतळे उभारण्याचा सपाटा लावण्यात येणार आहे. दिवंगत फुलनदेवी ज्या निषाद समाजाची होती त्या मतदारांची मते मिळविण्यासाठी त्यांनी हा खटाटोप सुरु केला आहे. Fulan devis statu unvilles in UP
वाराणसीसह १८ विभागांत पुतळे उभारण्यात येणार असून पुतळ्याची उंची १८ मीटर इतकी असेल. पुतळ्यांना सोनेरी रंग देण्यात आला आहे. बिहारमधील पशुसंवर्धन मंत्री मुकेश सहानी यांची ही कल्पना आहे. त्यांचा विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) हा घटकपक्ष बिहारमध्ये सत्तेत आहे. उत्तर प्रदेशात किमान १६५ जागा लढविण्याची घोषणा साहनी यांनी यापूर्वीच केली आहे. फुलनदेवीचे स्वप्न साकार करण्याचा आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, निषाद समाजाने एका व्यासपीठावर यावे, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे फुलनदेवी यांना वाटायचे. आपल्या बांधवांनी उच्च स्थान कमवावे म्हणून त्यांनी फुलनसेनेची स्थापना केली. आज फुलनदेवी जिवंत असत्या तर निषाद समाज मागे पडला नसता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App