स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती इच्छुक असूनही दुसऱ्या नेत्याला अध्यक्षपद देण्यासाठी कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. २०१४ पासून कॉंग्रेसच्या सुरू झालेल्या ऱ्हासाला राहूल गांधीच जबाबदार असल्याची भावना पक्षात वाढत आहे. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे कॉँग्रेस अध्यक्षपदाची धुरा द्यावी अशी मागणी पक्षातून वाढत आहे.Forming a front in the Congress for a president without the Gandhi family, the first discussion in post-independence history
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती इच्छुक असूनही दुसºया नेत्याला अध्यक्षपद देण्यासाठी कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे.
२०१४ पासून कॉंग्रेसच्या सुरू झालेल्या ऱ्हासाला राहूल गांधीच जबाबदार असल्याची भावना पक्षात वाढत आहे. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे कॉँग्रेस अध्यक्षपदाची धुरा द्यावी अशी मागणी पक्षातून वाढत आहे.
कॉँग्रेस पक्षाने नवीन अध्यक्ष आणि संघटनात्मक निवडणुका घेण्याचे ठरविले होते. मात्र, काही तासांतच हा निर्णय फिरविण्यात आला. मात्र, तरीही पक्षाच्या अनेक नेत्यांकडून निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमधील दारुण पराभवानंतर हा गट आणखीच सक्रीय बनला आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांपूर्वीच कॉँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, राहूल गांधी ब्रिगेडने त्यांना गप्प केले. त्यानंतर जम्मूमध्ये या नेत्यांनी बैठकही घेतली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला.
त्यामुळे राहूल गांधी यांचे नेतृत्व आता पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नाही, अशी भावना प्रबळ झाली आहे. प्रियंका गांधी या कॉँग्रेसच्या हातातील हुकूमाचा पत्ता मानला जात होता.
परंतु, उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत आणि आत्ताच्या आसाममध्ये प्रियंका गांधी यांच्या मर्यादाही उघड झाल्या. त्यामुळे त्यांच्या नावाची नेहमी होणार चर्चाही बंद झाली आहे.
उत्तर भारतातून पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला कॉँग्रेस अध्यक्षपदाचीजबाबदारी देण्याचा प्रवाह पक्षात प्रबळ होत आहे. आता जबाबदारी देण्याची वेळ आली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद यांच्या नावाची चर्चा आहे.
राहुल गांधी समर्थकांचा गट मात्र पुन्हा एकदा पक्षाची जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडेच दिली जावी यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, राहुल गांधी हे नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीत उतरण्यासाठी तयार नाहीत.
यावर सोनिया गांधी यांनीच यापुढेही हे पद स्वत:कडे ठेवावे, असाही प्रयत्न सुरू आहे. मात्र, आरोग्याच्या कारणास्तव त्या यासाठी तयार नाहीत.कॉँग्रेसमध्ये राहूल गांधी यांच्यासाठी काही जण मोर्चेबांधणी करत असले तरी कॉँग्रेसच्या आघाडीतील पक्षांचा त्यांच्या नावाला तीव्र विरोध आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांची एकी मजबूत केली जाऊ शकत नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, ज्या पक्षात आम्ही दीर्घकाळ राहिलो,
त्या पक्षाची दुरवस्था कशी पाहू शकतो. आता वेळ आली आहे की, आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी आम्ही पक्षांतर्गत संवाद करीत आहोत.
आनंद शर्मा यांच्या मते सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकणाºया नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. राहूल गांधी यामध्ये अपयशी ठरले असल्याचेच त्यांना सुचवायचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App