साध्या, पण थेट सवालांवर माजी RAW प्रमुख दुलत भडकले; भर मुलाखतीत पत्रकाराला मारायला धावले!!

Amarsingh Dulat

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : साध्या पण थेट सवालांवर माझी प्रमुख अमरजीत सिंह दुलत भडकले आणि भर मुलाखतीत पत्रकारालाच मारायला धावले. भारत रफ्तार टीव्हीच्या मुलाखती दरम्यान हा किस्सा घडला.

काँग्रेसच्या राजवटीत रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात RAW चे प्रमुख असलेले अमरजीत सिंह दुलत यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडून अनेक वाद ओढवून घेतले होते.

पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारत परत घेऊ शकत नाही, पाकिस्तानशी युद्ध हा चांगला पर्याय नाही, तो सगळ्यात वाईट शेवटचा पर्याय आहे, भारताने पाकिस्तानशी सतत चर्चा करत राहायला पाहिजे, 370 कलम हटवण्यापूर्वी काश्मिरी नेत्यांची चर्चा करायला हवी होती, पुलवामा हल्ला ही भाजपची देशाला “देणगी” होती. मुशर्रफ यांची राजवट पाकिस्तान आणि भारत संबंधांसाठी चांगली होती, द काश्मीर फाइल्स ही प्रोफोगांडा फिल्म होती, 1990 च्या दशकात झालेले काश्मिरी पंडितांचे शिरकाण तिथले स्थानिक नेते केंद्र सरकारवर नाराज असल्यामुळे झाले होते. त्यावेळी हिंदूंपेक्षा मुस्लिमच जास्त मारले गेले, अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये अमरजीत सिंह दुलत यांनी केली होती. त्यांनी पाकिस्तानच्या ISI चे प्रमुख असद दुर्रानी यांच्या बरोबर भारत पाकिस्तान संबंधांवर पुस्तक देखील लिहिले.

अमरजीत सिंह दुलत हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. राहुल गांधींचा फोन आला म्हणून मी त्यांच्या यात्रेत सामील झालो. कारण त्यांच्याशी माझे विचार जुळतात. मी काँग्रेसच्या राजवटीत सरकारी नोकरी केली, असे दुलत म्हणाले.

दुलत यांनी व्यक्त केलेल्या वेगवेगळ्या मतांवर आणि त्या मुद्द्यांवर भारत रफ्तार टीव्ही नेत्यांची मुलाखत घेतली. मात्र मात्र पुस्तकाच्या लिखाण संदर्भात तुम्ही पाकिस्तानला गेला होतात का??, या सवालावर अमरजीत सिंह दुलत भडकले आणि मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मारायला धावले. त्यांनी त्याला आई बहिणी वरून शिव्या दिल्या. मुलाखत अर्धवट सोडून ते निघून गेले.

Former RAW chief Amarsingh Dulat flared up on simple, but direct questions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात