वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड (वय ६६ ) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे. Former Mumbai batsman Rahul Mankad dies
माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या तीन मुलांपैकी राहुल हे सर्वात लहान होते. हे तिघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. सलामीवीर राहुल यांनी १९७२-७३ ते १९८४-८५ या कालावधीतील ४७ सामन्यांत ३५.७७च्या सरासरीने एकूण २१११ धावा केल्या.
यात पाच शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते. याशिवाय १९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App