विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना गँगरेपची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे म्हटले आहे.. पत्र पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्याने 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले. आरोपीने चिठ्ठीत आपला फोन नंबरही लिहिला आहे.Navneet Rana
पत्रात नवनीत राणा यांच्याबाबत आणखी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. तसेच त्यांचे पती रवी राणा यांच्याबद्दल अशोभनीय गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसात या विरोधात फिर्याद दिली आहे.
अभिनेत्री ते राजकारणी, अनेक वादांमध्ये नाव
नवनीत राणा या एक चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. नवनीत यांनी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी भाषेतील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ज्यात त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19731 मतांनी पराभव केला.
नवनीत राणांची वादग्रस्त विधाने…
8 मे 2024 रोजी हैदराबादमधील एका रॅलीत नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, – जर हैदराबादमध्ये पोलिसांनी 15 सेकंद माघार घेतली, तर दोन्ही भाऊ (ओवेसी बंधू) कुठे गेले हे कळणारही नाही. राणाचे हे विधान 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या भाषणाला प्रत्युत्तर मानले जात होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, जर पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवले तर आम्ही 25 कोटी (मुस्लिम) आणि 100 कोटी हिंदू नष्ट करू.
नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून उमेदवार बनवण्याबरोबरच भाजपने त्यांना गुजरातमध्ये स्टार प्रचारकही बनवले होते. 5 मे रोजी गुजरातमध्ये प्रचार करताना नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, ज्याला जय श्री राम म्हणायचे नसेल, तो पाकिस्तानात जाऊ शकतो. हा हिंदुस्थान आहे. भारतात राहायचे असेल तर जय श्री राम म्हणावेच लागेल.
एप्रिल 2022 मध्ये नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले होते. त्यांनी राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या पतीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App