जौनपूर येथील लाइनबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने माजी खासदार आणि जनता दल-युनायटेड (जेडीयू)चे राष्ट्रीय सरचिटणीस धनंजय सिंह यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अपहरण आणि खंडणी प्रकरणी जौनपूर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते.Former MP Dhananjay Singh sentenced to 7 years in kidnapping and extortion case
मुझफ्फरनगरचे रहिवासी अभिनव सिंघल यांनी माजी खासदार धनंजय सिंह आणि त्यांचा साथीदार विक्रम यांच्याविरुद्ध अपहरण आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली 10 मे 2020 रोजी जौनपूर येथील लाइनबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात, विक्रमने त्याच्या दोन साथीदारांसह आधी अभिनव सिंघल यांचे अपहरण केले आणि नंतर माजी खासदार धनंजय सिंह यांच्या घरी नेले, असा आरोप आहे. न्यायालयाच्या निर्णयावर धनंजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे धनंजय सिंह यांनी सांगितले आहे.
कोटसिंघल यांनी आरोप केला होता की, धनंजय सिंह पिस्तुल घेऊन तेथे आले आणि शिवीगाळ व धमकी देऊन खंडणीची मागणी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार धनंजय सिंह यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App