वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास
विशेष प्रतिनिधी
चंदीगढ : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे शुक्रवारी (20 डिसेंबर) निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. हरियाणातील गुरुग्राम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी मुख्यमंत्री चौटाला यांच्या निधनाने त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे प्रमुख होते.
ओमप्रकाश चौटाला यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील चौधरी देवीलाल हे देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांना लोक ताऊ म्हणत. ताऊ देवीलाल यांना पाच मुले होती. ओमप्रकाश चौटाला हे देखील चार मुलांपैकी एक होते. प्रताप चौटाला, रणजित सिंह आणि जगदीश चौटाला अशी ओपी चौटाला यांच्या भावांची नावे आहेत. देवीलाल उपपंतप्रधान झाल्यावर त्यांचा मोठा मुलगा ओमप्रकाश चौटाला यांनी राजकीय वारसा हाती घेतला आणि त्यानंतर ते हरियाणाचे मुख्यमंत्री झाले.
ओमप्रकाश चौटाला 1989 ते 1991 या काळात हरियाणाचे मुख्यमंत्री होते. 1991 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख घसरायला लागला. पण 1999 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणात भाजपसोबत आघाडी करून पुन्हा सरकार स्थापन केले. ते 2005 पर्यंत हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. 2001 मध्ये देवीलाल यांचे निधन झाले. ओमप्रकाश चार वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App