विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली,: LK Advani माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.LK Advani
3 जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात. त्यामुळे कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्चला लालकृष्ण आडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी आडवाणींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. 2015 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आडवाणी वाजपेयी सरकारमध्ये उप पंतप्रधान होते, ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App