मणिपूर हिंसाचाराबाबत माजी लष्करप्रमुखांना व्यक्त केली ‘ही’ शंका, म्हणाले…

मणिपूर हिंसाचारावरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून देशात खळबळ उडाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला एवढच नाहीतर संसदेचं कामकाजही स्थगित करण्यात आलं. दरम्यान, माजी लष्करप्रमुख  निवृत्त जनरल एमएम नरवणे यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत वेगळीच शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. Former Army Chief Manoj Naravane expressed doubt that foreign agencies are involved in Manipur violence

मणिपूर हिंसाचारात विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय नरवणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी शुक्रवारी (२८ जुलै) सांगितले की, मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नरवणे म्हणाले की, सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील बंडखोर संघटनांना चीनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचाही त्यांनी उल्लेख केला. माजी लष्करप्रमुख दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये मणिपूर हिंसाचारावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.

एम.एम.नरवणे पुढे म्हणाले की, मला खात्री आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि जी काही कारवाई झाली पाहिजे, ते ती सर्वतोपरी करत आहेत. मी म्हणतो की यात परदेशी एजन्सींचा सहभाग नाकारता येत नाही. त्यांचा या हिंसाचारात नक्कीच सहभाग आहे., चीन अनेक वर्षांपासून या बंडखोर संघटनांना मदत करत आहे आणि आताही करत राहील.

Former Army Chief Manoj Naravane expressed doubt that foreign agencies are involved in Manipur violence

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात