वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Prime Minister Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेसाठी गुरुवारी थायलंडच्या बँकॉक शहरात दाखल झाले. आगमनावेळी मोदी यांना रामायणाची थाई आवृत्ती ‘रामकियेन’ दाखवून त्यांचे स्वागत करण्यात आले.Prime Minister Modi
थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा यांनी मोदी यांना ‘द वर्ल्ड त्रिपिटक: सज्जया फोनेटिक एडिशन’ची भेट दिली. त्रिपिटक भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचा संग्रह असून त्याचे १०८ खंड आहेत. हा बौद्ध धर्माचा महत्त्वपूर्ण धर्मग्रंथ आहे. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये १९६० च्या दशकात अरावली जिल्ह्यात सापडलेले भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र अवशेष भारत थायलंड पाठवेल, असे जाहीर केले.
दरम्यान, रात्री पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहंमद युनूस एकाच व्यासपीठावर दिसले.दोघेही बिम्सटेक परिषदेच्या पूर्वसंध्येला आयोजित मेजवानीत सहभागी झाले. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर प्रथमच मोदी-युनूस यांच्यात पहिली बैठक होऊ शकते. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याही भेटीची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App