पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकातून भारतात आणण्यास गेलेले विविध यंत्रणांचे पथक जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मोकळ्या हाताने खासगी विमानाने मायदेशी येण्यास निघाले आहे.Following the postponement of Mehul Choksi’s extradition, the CBI team returned to India empty-handed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकातून भारतात आणण्यास गेलेले विविध यंत्रणांचे पथक जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मोकळ्या हाताने खासगी विमानाने मायदेशी येण्यास निघाले आहे.
डॉमिनिकातील उच्च न्यायालयाने चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी तहकूब केल्यानंतर हे पथक तेथून निघाले आहे. डॉमिनिकातील मेलविल हॉल विमानतळावरून खासगी विमानाने उड्डाण केले असून ते माद्रिदच्या दिशेने रवाना झाले आहे.
विविध यंत्रणांचे पथकही भारतात परतत आहे. सीबीआयच्या उपमहानिरीक्षक शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोक्सी याला परत आणण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा केली. चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारतातील एक टीम डॉमनिकामध्ये गेली होती. बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी भारताला हवा आहे. बँकिंग फ्रॉड प्रकरणे हाताळणाऱ्या सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या महिला अधिकारी या टीमच्या एक महत्वपूर्ण सदस्या आहेत.
यांच्या नेतृत्वातच पीएनबी बँक घोटाळ्यातील चौकशीला सुरूवात झाली होती. मेहुल चोक्सी हा २०१८ पासून एंटीगामध्ये राहत होता, त्याला डॉमनिकामध्ये अटक करण्यात आली आहे
२८ मे रोजी ही टीम त्याठिकाणी पोहचली होती. त्यानंतर सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचीही मदत घेण्यात येणार आहे. मेहूल चोक्सी हे भारतीय नागरिक असल्याचे मांडण्यात आले होते. मात्र, मेहूल चोक्सीची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App