वृत्तसंस्था
जयपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपचा पराभव लिहून दिला होता. प्रत्यक्षात काय झाले?, हा भाग अलहिदा पण आता त्या पुढे जाऊन राहुल गांधींनी भाजपला खाली आणायचा शब्द दिला आहे. Following kejriwal’s political footsteps, Rahul Gandhi claims to mark his words Congress will bring down BJP government
राहुल गांधींनी दिलेल्या शब्दाचे महत्त्व असे : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानात आहे. तेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अनेक दावे केले आहेत. यापैकीच एक दावा भाजपला खाली आणण्याचा आहे. राहुल गांधी म्हणाले, मार्क माय वर्ड काँग्रेसच भाजपला खाली आणेल!!
काँग्रेसचा आम आदमी पार्टीवर राग; समाजवादी पक्षाचा बसपवर आक्षेप; तरीही विरोधकांना ऐक्याची अपेक्षा
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लिहून दिले होते, आम आदमी पार्टीचा गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय होईल आणि भाजपचा पराभव होईल. प्रत्यक्षात भाजपने तिथे रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला काँग्रेसचे 149 जागांचे रेकॉर्ड तोडून 154 जागा मिळवल्या. आपला तिथे फक्त 5 जागा जिंकता आल्या आणि काँग्रेस जी 2017 मध्ये डिस्टिंक्शन मध्ये 77 जागांवर होती. ती 21 जागांपर्यंत खाली आली.
आता राहुल गांधींनी राजस्थानतल्या पत्रकार परिषदेत मार्क माय वर्ड काँग्रेसच भाजपला खाली आणेल, असा शब्द दिला आहे. 2024 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी मार्क केलेल्या वर्ल्डचे नेमके काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पण त्याचवेळी राहुल गांधींनी काँग्रेस अंतर्गत बंडाळीवर देखील वेगळे भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये जो कोणी बोलू इच्छित असेल त्याला आम्ही बोलू देतो. हे फक्त राजस्थानातच नाही तर संपूर्ण देशात लागू आहे. कारण पक्षांतर्गत बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही दाबून ठेवत नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात उभा राजकीय दावा आहे. दोघांमधून आजही विस्तव जात नाही. भारत जोडो यात्रेत जरी ते राहुल गांधींच्या डाव्या – उजव्या बाजूला चालले असले तरी एकमेकांचे गट एकमेकांविरोधात आजही आगपाखड करतात. त्या मुद्द्यावरच भाष्य करताना राहुल गांधींनी आम्ही कोणाचा आवाज काँग्रेसमध्ये दाबत नाही, असे उत्तर देऊन गटबाजीला हवा दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App