मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्य सरकारच्या कामगिरीचे केले कौतुक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अधिकाऱ्यांची कार्यक्रमास उपस्थिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ध्वजवंदन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.Flag hoisting by Governor Ramesh Bais at Chhatrapati Shivaji Park in Mumbai



यावेळी बोलताना महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल अशा विविध संरक्षण दलांनी शानदार संचलन केले. तसेच राज्य शासनाचे नगरविकास, मृद आणि जलसंधारण, उमेद, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाले होते.

Flag hoisting by Governor Ramesh Bais at Chhatrapati Shivaji Park in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात