चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उलटल्या, तिघांचा मृत्यू अनेक जखमी

रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

गोंडा :चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी उलटल्या. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.Five coaches of Chandigarh Dibrugarh Express overturn, three killed; Many injured



गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावर मोतीगंजच्या पिकौरा गावाजवळ हा अपघात झाला. चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उलटल्या. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

गोंडा येथे झालेल्या रेल्वे अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Five coaches of Chandigarh Dibrugarh Express overturn, three killed; Many injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात