मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्हा प्रशासनाची अभूतपूर्व कामगिरी; आधी नक्षलवाद्यांचे आत्म समर्पण, आता राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

Naxalites

विशेष प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत ‘उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी’चा पुरस्कार स्वीकारला.
70% पेक्षा जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे प्रशासकीय सेवा पोहोचविण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लोककल्याणकारी प्रशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोलीचा समावेश आहे. Naxalites



– साठ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दोनच दिवसांपूर्वी गडचिरोलीत झालेल्या कार्यक्रमात 60 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. यामध्ये डोक्यावर सहा कोटी रुपयांचे बक्षीस असणारा माओवादी कमांडर मल्लूझुला वेणू गोपाल राव उर्फ सोनू भूपती याचा समावेश होता.

देशातला माओवादी नक्षलवाद संपविण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उचलल्यानंतर नक्षलवादी पट्ट्यातील सगळी राज्ये सक्रिय झाली. त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेऊन नक्षलवाद्यांना एकतर टिपले किंवा त्यांना शरण यायला भाग पाडले. त्यातलाच एक टप्पा म्हणून सोनू भूपती त्याच्यासाठीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पित झाला. यामध्ये गडचिरोली पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्या पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्याला राष्ट्रपतींनी उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनाचा पुरस्कार दिला. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आता नक्षलवादाच्या नकारात्मक घटनांपेक्षा दोन मोठ्या सकारात्मक घटनांमुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला.

First the self-surrender of Naxalites, now the award from the President

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात