विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : भारत करणार आता कोरोनावर तिहेरी मारा .कारण भारतात असणार्या आधीच्या दोन लसींच्या साथीला रशियातून ‘स्पुटनिक-व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. या लसीचा स्टॉक घेऊन रशियन विमान आज शनिवारी हैदराबाद येथे दाखल झाले. First batch of SputanikV vaccine arrives in Hyderabad India !
१ मे पासून देशभरात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. देशातील काही राज्यांत लसीचा तुटवडा जाणवत असताना भारतासाठी ही एक चांगली बातमी आहे. रशियात तयार झालेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे.
First batch of #SputnikV vaccine arrives in Hyderabad, India! That's the same day the country starts mass COVID vaccination drive covering its entire adult population. Let's jointly defeat this pandemic. Together we are stronger.✌️ pic.twitter.com/312Kvtax1L — Sputnik V (@sputnikvaccine) May 1, 2021
First batch of #SputnikV vaccine arrives in Hyderabad, India! That's the same day the country starts mass COVID vaccination drive covering its entire adult population. Let's jointly defeat this pandemic. Together we are stronger.✌️ pic.twitter.com/312Kvtax1L
— Sputnik V (@sputnikvaccine) May 1, 2021
‘स्पुटनिक-व्ही’ ने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीला आपल्याला हरवायचं आहे आणि आपण सर्वजण एकत्र येऊन ही गोष्ट नक्कीच करु शकतो असं ‘स्पुटनिक-व्ही’ च्या ट्विटर अकाउंट वर म्हटलं आहे.
भारतात एकूण सहा टप्प्यांमध्ये ही लस आणली जाणार असून पहिला टप्पा मे महिन्यात आलेला आहे.
डॉ. रेड्डीजचे सीईओ दीपक सप्रा यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत लसीबद्दल माहिती दिली होती. डॉ. रेड्डीज या प्रयोगशाळेने एप्रिलच्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे संमती मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात या लसीची चाचणी केली होती. स्पुटनिक व्ही च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही लस 91 टक्के प्रभावी आहे.
2021 या संपूर्ण वर्षात स्पुटनिक व्ही या लसीचे 12 ते 13 कोटी लोकांना लस देण्याची आमची तयारी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील लसी आयात केल्या जातील या लसी उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा भारतात निर्मिती सुरू होईल तेव्हा आम्ही त्या केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि खासगी रूग्णालयांना देणार आहोत असंही सप्रा यांनी सांगितलं.
या लसीची किंमत भारतात काय असेल तेव्हा दीपक सप्रा म्हणाले की ‘रशियाकडून आयात होणाऱ्या लसीच्या किंमतीत आणि भारतात तयार होणाऱ्या लसींच्या किंमतीत फरक असेल. आम्ही त्यावर विचार करतो आहोत. स्पुटनिक व्ही ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचंही सप्रा यांनी स्पष्ट केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App