Arjun Singh : भाजप नेते अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानीही गोळीबार आणि बॉम्बस्फोट!

Arjun Singh

भाजपचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर केला गेला आरोप

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाटपारा येथे भाजप नेते आणि माजी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

अर्जुन सिंह आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, परंतु ते घटनास्थळावरून पळून गेले. बराकपूरचे पोलिस आयुक्त अजय ठाकूर म्हणाले, “परिस्थिती आता नियंत्रणात आहे. संबंधितांना सोडले जाणार नाही. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”



या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक सुनीता सिंह यांचा मुलगा नमित सिंह असल्याचा आरोप अर्जुन सिंह यांनी केला. त्यांनी दावा केला की, “नमित सिंह याने पोलिसांसमोर अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले.”

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील मेघना जूट मिलमध्ये कामगारांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर हिंसाचार झाला. दरम्यान, टीएमसी जगद्दलचे आमदार सोमनाथ श्याम यांनी अर्जुन सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला.

Firing and bomb blasts also took place at the residence of BJP leader Arjun Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात