प्रतिनिधी
मुंबई : 1 जानेवारी 2023 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आगीचे सत्र सुरु झाले की काय, असे वाटावे, अशा घटना घडत आहेत. कारण नाशिक येथे जिंदाल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली, ही आग अजून आटोक्यात आलेली नसताना आता बार्शी येथे आग आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार 5 जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. Firecracker factory fire in barshi
नाशिक मधील जिंदाल कारखान्यातील आग अद्याप आटोक्यात आली नसून एकूण 14 जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे, तर उपचारादरम्यान एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सिल्लोड मधला दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. जिंदाल कारखान्यातील आगीची भीषणता लक्षात घेता प्रशासनाने नाशिक शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात 100 बेड तयार ठेवल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. जखमींवर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बार्शीतील स्फोटाचा आवाज 10 किलोमीटरवर
बार्शीतील आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. या ठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार, १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान 5 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत तो ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App