विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा काय तर केवळ दोनशे रुपये दंड. पंजाब पोलीसांनी आंदोलन करून ताफा अडविणाऱ्यांवर गुन्हा तर दाखल केला आहे पण त्यासाठी लावलेल्या कलमांना केवळ दोनशे रुपये दंड आहे. यामुळे पंजाब पोलीसांची भूमिका पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.Fine of Rs 200 for those who endangered the Prime Ministers security, The role of Punjab Police is in doubt
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडू शकले नसल्याने पंतप्रधानांनी सभेसाठी रस्त्याच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंजाब पोलीसांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही. रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमुळे पंतप्रधानांना २० मिनिटे रस्त्यावर थांबावे लागले.
या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यासही विलंब लावला. मात्र, नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात केवळ २०० रुपये दंडात्मक कारवाई करुन सुटका होते.फिरोजपूर इथं पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला गेला तरीही एफआरआरमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख नाही.
आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांचा ताफा रोखला असेही म्हटले नाही. ज्या मुद्द्यावरुन टीका होत आहे त्यालाच बगल देण्याचे काम पंजाब पोलिसांनी केले आहे. एफआरआरमध्ये आंदोलनामुळे सर्वसामान्य, रॅलीत जाणारे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गाड्यांसाठी रस्ता बंद झाला असा उल्लेख करण्यात आला आहे.
पंजाब पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेचे कलम २८३ लावले आहे. या गुन्ह्यासाठी केवळ २०० रुपये दंडाची तरतूद आहे. कलम २८३ मध्ये पोलीस ठाण्यातच जामीन मिळतो. आरोपीला कोर्टात जाण्याचीही आवश्यकता भासत नाही. त्यामुळे जाणुनबुजून ही कलमे लावल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआरआरमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही. १५० अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वास्तविक पोलिसांना आंदोलनकर्त्या नेत्यांची नावं माहिती आहे. मग पोलिसांनी एफआयआर नोंदवताना नावं का लपवली? असा सवाल केला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक बीरबल सिंग यांच्या जबाबावर गुन्हा नोंद केला. त्यानुसार, बीरबल सिंग अडीच ते ३ वाजेपर्यंत फिरोजपूरच्या प्यारेआणा फ्लायओव्हरवर पोहचले होते. परंतु ते पोहचले त्याच्या दीड तास आधी पंतप्रधान पुन्हा भटिंडा एअरपोर्टला पोहचले होते. फ्लायओव्हरवर काही अज्ञात व्यक्ती आंदोलन करत होते असं पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App