या आर्थिक सर्वेक्षणातून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा लेखाजोखा उपलब्ध होणार आहे Finance Minister Nirmala Sitharaman will present the economic survey report in Parliament today!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या अगदी आधी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.
या आर्थिक सर्वेक्षणातून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा लेखाजोखा उपलब्ध होणार आहे. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी देशात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. हे अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांच्या वाढीचा वेग आणि चिंता याबद्दल तपशीलवार माहिती सादर करते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘या’ दिवशी अर्थसंकल्प सादर करणार
आर्थिक सर्वेक्षण हा देशाच्या आर्थिक आरोग्याचा लेखाजोखा आहे. अर्थमंत्री संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करतात. आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाचा प्रमुख वार्षिक दस्तऐवज आहे. गेल्या वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था कशी होती हे यावरून कळते. अर्थसंकल्पाचाही तो मुख्य आधार आहे. सरकार या दस्तऐवजाच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती सांगते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App