विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची अखेर दहा वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौटाला यांना न्यायालयानं १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.Finally, after ten years, former Chief Minister Omprakash Chautala was released from jail and arrested in a teacher recruitment case
बहुचर्चित जेबीटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे.चौटाला हे अगोदरपासूनच पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेर आहेत. त्यामुळे आता केवळ सुटकेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांना तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.
आपल्या तुरुंगातील शिक्षेचा वेळ कारणी लावत ८२ वर्षीय माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. चौटाला यांनी बारावीत प्रथम श्रेणी मिळवलीय. शिक्षे दरम्यान ते तिहार तुरुंगातील कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या सेंटरवर नॅशनल ओपन स्कूलद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी बसले होते.
अंतिम परीक्षा २३ एप्रिल रोजी पार पडली होती. या दरम्यान चौटाला पॅरोलवर तुरुंगाबाहेर पडले होते. परंतु, परीक्षा केंद्र तुरुंग परिसरात असल्यानं ते तुरुंगात परतले आणि परीक्षेसाठी बसले.सीबीआयच्या विशेष न्यायालयानं २२ जानेवारी २०१३ रोजी चौटाला यांच्यासहीत ५५ आरोपींना जेबीटी घोटाळ्या प्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
आरोपींनी अवैध पद्धतीने ३२०६ ज्युनिअर बेसिक शिक्षकांची भर्ती केली होती. ही भर्ती २००० मध्ये करण्यात आली होती. त्यावेळेस ओम प्रकाश चौटाला हरयाणाचे मुख्यमंत्री होते. आरोपींनी खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या सुनावणी दरम्यान चौटाला मेडिकल ग्राऊंडवर अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र त्यानंतर आॅक्टोबर २०१४ मध्ये चौटाला यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App