विशेष प्रतिनिधी
मुंबई : Khalid Ka Shivaji ‘खालिद का शिवाजी’ शिवाजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादांवरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाचा तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक पत्रक जाहीर करून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. “सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.Khalid Ka Shivaji
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील काही संवादांवरून वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडलेल्या हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान, काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी केली. सिनेमातील काही विशेष संवादांवर त्यांचा आक्षेप होता, ज्यात शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांची टक्केवारी आणि रायगडावर मशीद बांधण्याच्या उल्लेखाचा समावेश होता.Khalid Ka Shivaji
निर्मात्यांनी पत्रकार काय म्हटले?
नमस्कार समस्त रसिक मायबाप प्रेक्षकहो, तुमत्त्याशी जरा बोलायचंय, तुम्हाला काही सांगायचंय म्हणुन हा प्रपंच. आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही, आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही राहातील पण छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही.
येणाऱ्या 8 ऑगस्ट 2025 रोजी आमचा “खालिद का शिवाजी” हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झालीत. या अनुषंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय. आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने 4 आक्षेप नोंदवले गेलेत त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे.
आकडे चुक असतीलही पण माहिती अनैतिहासीक नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते आणि त्यांचे 11 अंगरक्षक मुस्लीम समाजाचे होते. याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासीक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कर्तृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकूण सैन्य किती आणि त्या एकूण सैन्यात कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य. आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा कमी देखील. मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासिकच आहे. छत्रपती महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलतखान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लीम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते, अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती. जसे अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते त्यामुळे आकडे चुक असतीलही पण माहिती अनैतिहासीक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App