खळबळजनक! कोट्यवधींच्या ‘ड्रग्स’सह फौजदार विकास शेळकेला अटक

पोलिसांकडेच आता ड्रग्स साठा सापडल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.


विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : मागील काही दिवसांपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ड्रग्सची प्रकरणी मोठ्याप्रमाणात वाढली आहेत. पुणे पोलिसांनी मागील महिन्यात कोट्यवधींचा ड्रग्ससाठा जप्त केला तरीही ही प्रकरणं थांबलेली नाहीत. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमधून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे.Faujdar Vikas Shelke arrested with drugs worth crores

या ठिकाणी एका फौजदाराकडेच कोट्यवधींचा ड्रग्स साठा सापडला आहे. निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या या फौजदारेच नाव विकास शेळके असून, त्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ४५ कोटींचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला आहे.



शेळके यास मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्याच्याकडे एकूण ४४.५० किलो एमडी ड्रग्स आढळले जे पोलिसांनी जप्त केले आहे. पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी या अगोदरग नमामी शंकर झा या व्यक्तीस अटक करून त्याच्याकडून दोन कोटींचा ड्रग्स जप्त केला होता, पुढे त्याचा संबंध फौजदार शेळकेशी असल्याचे उघड झाले.

पोलिसांकडेच आता ड्रग्स साठा सापडल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय सर्वसामान्य जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त करून, पोलिस प्रशासनावर टीका सुरू झाली आहे.

Faujdar Vikas Shelke arrested with drugs worth crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात