मुस्लिमांसाठी शरियत कायदा आहे, कही कोई तुफान ना आ जाये; समान नागरी कायद्यावर फारूक अब्दुल्लांची धमकी

वृत्तसंस्था

श्रीनगर : देशात मोदी सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याची चर्चा सुरू केल्याबरोबरच विरोधकांचे कान उभे राहिले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या दिशेने वाग्बाण फेकायला सुरुवात केली आहे. पण त्या पलीकडे जाऊन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी कही कोई तुफान ना आ जाये, अशा शब्दांत मोदी सरकारला धमकी दिली आहे. Farooq Abdullah’s Threat on Equal Civil Rights

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या 10 लाख कार्यकर्त्यांना संबोधित करताना जे प्रश्न उत्तर सेशन घेतले, त्यामध्ये समान नागरी कायद्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रीम कोर्टाचा हवाला दिला आणि त्या कायद्याची आवश्यकता प्रतिपादन केली. मोदींच्या उत्तराचा विरोधकांनी ताबडतोब श्लेष काढून मोदी सरकार देशात समान नागरी कायदा आणायला तयार झाल्याच्या कांगावा सुरू केला. यातच डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी दिलेल्या धमकीची भर पडली आहे.

डॉ. फारूक अब्दुल्ला म्हणाले, की आजकाल सरकार मधले काही लोक समान नागरी कायद्याची बात करत आहेत. मला असे वाटते की त्यांना याचा विचार केला पाहिजे, की हा देश विविधतेने नटलेला आहे. यात अनेक धर्माचे, अनेक भाषांचे लोक राहतात. मुसलमानांचा स्वतःचा शरियत कायदा आहे. त्यावर त्यांनी नजर ठेवली पाहिजे. त्यांनी समान नागरी कायद्यासंदर्भात सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. इतकेच नाही तर त्यांनी कुठली पावले उचलली तर कुठून मोठे वादळ तर निर्माण होणार नाही ना!!, याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात डॉ. फारूक अब्दुल्लांनी मोदी सरकारला धमकी दिली.

सीएए आणि एनआरसी कायदे मोदी सरकारने लागू केल्याबरोबर शाहीन बाग सारखे आंदोलन उभे राहिले होते. त्यात लिबरल जमातीने आपली राजकीय पोळी भाजून घेतली. कृषी कायद्यांच्या विरोधात देखील मोठा राजकीय तमाशा खडा केला. आता ज्यावेळी देशात समान नागरी कायद्याची चाचपणी सुरू झाली आहे, त्यावेळी डॉक्टर फारूक अब्दुल्लांच्या मुखातून, कही कोई तुफान ना आ जाये!! अशी धमकी भरली भाषा बाहेर आली आहे.

Farooq Abdullah’s Threat on Equal Civil Rights

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात