Farmers : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा

Farmers

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Farmers पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या (Punjab) पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अडवले. समजूत घालून त्यांना परत जाण्यास सांगितले. Farmers

पण आंदोलक बॅरिकेड्स ढकलून पुढे जाऊ लागले. पोलिसांशी त्यांची धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. वॉटर कॅनने पाण्याचा माराही केला. यात सुमारे १७ आंदोलक शेतकरी जखमी झाले.Farmers

यादरम्यान शंभू सीमेवर लुधियानातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचे नाव जोधसिंह असल्याचे सांगितले जाते. शेतकरी नेते तेजवीरसिंह यांनी सांगितले की, जोधाची प्रकृती गंभीर आहे. जखमींची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्त रस्त्यातच थांबण्याचा निर्णय घेतला.Farmers

शेतकरी मजदूर मोर्चाचे महासचिव सरवनसिंह पंधेर म्हणाले, 16 डिसेंबर रोजी पंजाबचा अपवाद वगळता देशभर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. 18 डिसेंबरला पंजाबमध्ये रेल रोको करणार आहोत.

पंधेर म्हणाले, शेतकऱ्यांवर केमिकलयुक्त पाणी, बॉम्ब फेकण्यात आले. त्यामुळे काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

Farmers Nationwide tractor march tomorrow

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात