Farmers Distressed : राज्यातील शेतकरी त्रस्त अन् कृषिमंत्री ‘रमी’ खेळण्यात व्यस्त; व्हिडिओवरून रोहित पवारांचा कोकाटेंवर हल्लाबोल

 Farmers Distressed

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  Farmers Distressed कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कोकाटेंवर जोरदार टीका केली आहे. “कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या!” अशा आशयाच्या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला. Farmers Distressed

दरम्यान मी कोणताही गेप खेळत नव्हतो. यूट्यूबवर गेल्यावर अनेक जाहिराती येत असतात. वरच्या सभागृहात काय सुरू हे बघण्यासाठी यूट्यूब सुरू केले तेव्हा ती जाहिरात आली आणि मी ती स्किप केली. पण काही सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. Farmers Distressed



रोहित पवार यांनी X वर लिहिले की, जंगली रमी पे आओ ना महाराज…! सत्ताधारी राष्ट्रवादी गट भाजपला विचारल्याशिवाय काहीच निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतीच्या प्रश्नांवर निर्णयच होत नाहीत. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री निवांत रमी खेळत असल्याचे दिसत आहे, असे म्हणत रोहित पवारांनी काेकाटेंवर निशाणा साधला आहे.

रोहित पवारांचे X वरील पोस्ट काय?

आमदार रोहित पवार म्हणाले की, जंगली रमी पे आओ ना महाराज…! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषि मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिक विमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी_शेतीवर_या_महाराज खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या ‘रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिक विमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?’ असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.

शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय… वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार म्हणाले की, या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणंघेणं राहिलं नाही, शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय, म्हणून माझं शेतकरी बांधवांना आवाहन आहे यांना धडा शिकवा.

मंत्र्यांचे व्हिडिओ सरकारसाठी डोकेदुखी

महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ सातत्याने समोर येत असल्यामुळे सरकार अडचणीत येत असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते बनियान मध्ये असून त्याच्या खोलीत रोख रक्कम भरलेली बॅग दिसत होती. त्याआधी आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता.आता कृषी मंत्रीच मोबाइलवर रमी खेळताना दिसत असल्याने, सरकारमधील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 Farmers Distressed: Agriculture Minister Plays Rummy; PHOTOS, VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात