विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील शेतकºयांना एक विशेष ओळखपत्र देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ज्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या सर्व कृषी योजनांसोबत त्यांना जोडण्याचे काम हे या विशेष ओळखपत्राच्या माध्यमातून केले जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.Farmers across the country will get a special identity card
केंद्र सरकारच्या या पुढाकारामुळे ई-केव्हायएफच्या (नो युअर फॉर्मस) माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख करण्यात मदत मिळेल. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांसाठी विविध विभागांमध्ये वारंवार कागदपत्रे जमा करण्याच्या समस्येतून दिलासा मिळेल,
असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला. हवामानाच्या स्थितीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाचे आकलनदेखील या विशेष ओळखपत्राच्या मदतीने केले जाईल.मोदी सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात.
ही रक्कम थेट बॅँकेत जमा होते. या योजनेचा लाभ काही बिगर शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या योजनेची नियमावली कडक करण्यात आली आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळाल्यामुळे शेतकरी सन्मान योजनेचा निधी खऱ्या अर्थाने गरजुंपर्यंत पोहाचणे शक्य होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App