विशेष प्रतिनिधी
नागपूर: नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपुरात काल रात्री एक वाजेच्या सुमारास निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ते आपल्या मुलासह नागरपूरमध्येच राहात होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राम कदम- राम व विजय पाटील – लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. आज पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले .Famous musician Ram Laxman dies; Superhit music for the films ‘Maine Pyaar Kiya’ and ‘Hum Aapke Hain Kaun’
लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.
प्रतिभाशाली संगीतकार राम लक्ष्मण( विजय पाटील) जी के निधन की खबर से मैं बहुत व्यथित हूँ. उनका पहला गीत मैंने गाया, और सबसे ज़्यादा गाने मैंने गाए, दादा कोंडके जी की फ़िल्मोंके सभी गीत मैंने गायें जओ बहुत लोकप्रिय हुए. उनका संगीतबद्ध किया दिल दीवाना ये गाना मुझे बहुत पसंद है। — Usha Mangeshkar (@ushamangeshkar) May 22, 2021
प्रतिभाशाली संगीतकार राम लक्ष्मण( विजय पाटील) जी के निधन की खबर से मैं बहुत व्यथित हूँ. उनका पहला गीत मैंने गाया, और सबसे ज़्यादा गाने मैंने गाए, दादा कोंडके जी की फ़िल्मोंके सभी गीत मैंने गायें जओ बहुत लोकप्रिय हुए. उनका संगीतबद्ध किया दिल दीवाना ये गाना मुझे बहुत पसंद है।
— Usha Mangeshkar (@ushamangeshkar) May 22, 2021
या सिनेमांना दिलं संगीत
पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हंटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.
राम-लक्ष्मण नावामागची गोष्ट राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यूनंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे. नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.Famous musician Ram Laxman dies; Superhit music for the films ‘Maine Pyaar Kiya’ and ‘Hum Aapke Hain Kaun’
हिंदी सिनेसृष्टीतील ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तसंच उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी अनेक गाणी गाऊन घेतली आहेत. 1989 च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान खान अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App