प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये केला प्रवेश!

या अगोदर काँग्रेसच्या तिकिटावर शत्रुघ्न सिन्हांना दिले होते आव्हान Famous actor Shekhar Suman joined BJP

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अलीकडेच शेखर संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या डेब्यू वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. तेव्हापासून हा अभिनेता कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता मंगळवारी त्यांनी राजकारणात उतरून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

या अभिनेत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करण्यासाठी ते मंगळवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले होते. शेखर सुमन राजकारणात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर याआधी त्यांनी 2009 मध्येही राजकारणात नशीब आजमावले होते.

त्यावेळी त्यांनी पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये, अभिनेत्याचा सामना ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी झाला, तेव्हा ते भाजपमध्ये होते, त्यावेळी शेखर सुमन यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी पराभूत केले होते.

अलीकडेच राजकारणातील आपले जुने दिवस आठवत शेखर सुमन म्हणाले, ‘मी नकळत राजकारणात आलो. माझी अशी इच्छा कधीच नव्हती, पण कधी कधी असं होतं की तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल व्हायला लागतं आणि मी हे सगळं केलं कारण मला माझ्या शहरासाठी, माझ्या समाजासाठी आणि माझ्या राज्यासाठी काहीतरी योगदान करायचं आहे.’

Famous actor Shekhar Suman joined BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात