General Asim Munir : खोट्या यशाच्या फुशारक्या; पराभव झाकण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद!

General Asim Munir

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : General Asim Munir भारतीय लष्कराकडून झालेल्या दारुण पराभवावर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात बनवटा अभिमान निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर पदोन्नती दिली आहे. १९५९ नंतर हे पद दिलं गेलेलं हे केवळ दुसरं उदाहरण असून, यामागे खऱ्या शौर्यापेक्षा राजकीय प्रदर्शन अधिक दिसून येत आहे.General Asim Munir

भारतीय लष्कराने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करून मोठा धक्का दिला. या जबरदस्त प्रत्युत्तरानंतर चार दिवस सुरू राहिलेल्या संघर्षात पाकिस्तानने मोठे नुकसान सोसले. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देता न आल्यामुळे पाकिस्तानची लष्करी यंत्रणा गडबडली, आणि शेवटी पाकिस्तानच्या डीजीएमओने स्वतः भारताशी संपर्क साधून कारवाया थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे पाकिस्तान भारताच्या हल्ल्यामुळे धास्तावला होता हे स्पष्ट होते.



पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जाहीर करण्यात आले की, ‘ऑपरेशन बुनयान-उम-मरसूस’च्या नावाखाली पाकिस्तानने भारताला परतवून लावल्याचा दावा केला जात आहे, पण सत्य हे की भारताने केवळ दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानला लष्करी पातळीवरही झुकवले.

जनरल असीम मुनीर यांचं नेतृत्व हे युद्धकौशल्यापेक्षा पराभव लपवण्याचे माध्यम ठरले. मात्र पाकिस्तान सरकार त्यांना विजयाचा नायक ठरवून त्यांच्या पदोन्नतीचे गोडवे गात आहे. हे स्पष्टच आहे की, ही पदोन्नती वास्तवातल्या पराभवावर खोटं यश झाकण्याचा प्रयत्न आहे.

राष्ट्रपती झरदारी यांनी देखील या पदोन्नतीस पाठिंबा दिला, पण भारताने ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या आश्रयस्थळांवर तडाखेबंद कारवाई केली, त्यातून संपूर्ण जगाला भारताची क्षमताच नव्हे तर पाकिस्तानची हतबलताही दिसून आली. त्यामुळे पाकिस्तानने आता फील्ड मार्शलचा तमाशा मांडून देशातील जनतेचे लक्ष खऱ्या पराभवापासून वळवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.

False boasting of success; General Asim Munir given the rank of Field Marshal to cover up defeat!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात