विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवी दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, योगी आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचे दिसून येत आहे.यावरून हा व्हिडिओ व्हायरल करणार्यांना नेटकर्यांनी चांगलाच चोप दिला आहे. योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.FACT CHECK: This is a conspiracy to discredit Chief Minister Yogi Adityanath; Instructions for legal action based on forensic report
फॅक्ट चेक करण्यासाठी जेव्हा ह्या व्हिडिओची सखोल शहानीशा करण्यात आली तेव्हा जे सत्य समोर आले ते काही वेगळेच होते.
जेव्हा आम्ही या व्हायरल व्हिडिओची तपासणी केली तेव्हा प्रकरण काही वेगळेच असल्याचे समोर आले जे अत्यंत धक्कादायक आहे. यूपी सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, खटल्याच्या फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एएनआयशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असताना शेवटच्या 6 सेकंदात त्यांनी पत्रकाराला शिवी दिल्याचे दाखवून त्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वास्तविक, मुख्यमंत्री योगी यांचा 26 सेकंदाचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये सीएम योगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्रालय आणि देशातील वैज्ञानिकांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद देत आहेत.
व्हिडिओच्या शेवटच्या 3 सेकंदात त्यांना रागाने बोलताना ऐकू येत आहे. हे प्रकरण देशातील सर्वात मोठे राज्य आणि देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याशी संबंधित होते, मग या व्हिडिओच्या तळाशी जाणे आवश्यक झाले. त्याच वेळी या व्हिडिओची तपासणी केली असता हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले.
मुंबई युवक काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अतिशय खालच्या पातळीची टीका युवक काँग्रेसने केली आहे.
व्हिडिओच्या सखोल तपासणीत सीएम योगी यांच्या मूळ व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे. व्हिडिओची शेवटची 3 सेकंदांची फ्रेम संपादित केली गेली आणि सीएम योगीसारखा आवाज त्यात पेस्ट करण्यात आला आहे.
दरम्यान, या व्हिडीओवरून काही जणांनी सूर्य प्रताप सिंह यांच्यावर टीका केली आहे. बेनीवाल नावाच्या व्यक्तीने उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करत म्हटलं आहे की, कृपया, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी छेडछाड करण्यात आलेला व्हिडीओ शेअर करणाऱ्याविरोधात करावाई करावी.” दुसऱ्या एकाने थेट योगी आदित्यानाथ यांनाच टॅग केलं असून, ‘सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपल्या नावाने हे पसरवत आहे,” असं म्हटलं आहे.
FACT CHECK: This is a conspiracy to discredit Chief Minister Yogi Adityanath; Instructions for legal action based on forensic report
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App