नेहरू संग्रहालयाच्या नामकरणाबद्दल ‘या’ माजी पंतप्रधानांच्या मुलाकडून मोदींचे कौतुक अन् काँग्रेसला म्हटले ‘घराणेशाही’

मोदी यांनी सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांचा सत्कार केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नीरज शेखर यांनी नेहरू संग्रहालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे त्यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला आहे. नीरज शेखर यांनी एक ट्विट शेअर करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला. Ex PMs son praises Modi for naming Nehru museum calls Congress dynasty

शुक्रवारी (16 जून) दिल्लीतील तीन मूर्ती भवन संकुलात असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे नामकरण ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी’ असे करण्यात आले. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून टीका होत आहे. तर भाजपाच्या नेत्यांकडून काँग्रेसला प्रत्युत्तर दिले जात आहे.

खर्गे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत नीरज शेखर यांनी म्हटले, “माझे वडील, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी नेहमीच राष्ट्रहितासाठी काम केले, त्यांनी काँग्रेससोबतही काम केले. परंतु त्यांनी (काँग्रेस) कधीही एका घराणेशाहीच्या पलीकडे पाहिले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांचा सत्कार केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ही एक भयानक वृत्ती आहे.’’

याचबरोबर राज्यसभा खासदार नीरज शेखर यांनी पुढे लिहिले की, “मला सर्व काँग्रेस नेत्यांना विचारायचे आहे – ते किती वेळा पंतप्रधानांच्या संग्रहालयात गेले आहेत? सोनिया गांधी किंवा राहुल गांधी कधी तिथे गेले आहेत का? एका वंशाच्या पलीकडे असलेल्या लोकांनी आपले राष्ट्र निर्माण केले हे सत्य स्वीकारण्याची त्यांची असमर्थता विकृत आहे आणि ते निःसंदिग्ध निषेधास पात्र आहेत.’’

Ex PMs son praises Modi for naming Nehru museum calls Congress dynasty

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात