Ex PM Manmohan Singh Daughter Daman Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी त्यांच्या वडिलांचे उपचार घेत असलेल्या फोटोंवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. द टेलिग्राफला दिलेल्या प्रतिक्रियेत दमन सिंह म्हणाल्या की, माझे पालक कठीण परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वृद्ध आहेत. प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत. Ex PM Manmohan Singh Daughter Daman Singh Reaction After Her Father Photos Viral On Social Media
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी त्यांच्या वडिलांचे उपचार घेत असलेल्या फोटोंवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. द टेलिग्राफला दिलेल्या प्रतिक्रियेत दमन सिंह म्हणाल्या की, माझे पालक कठीण परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वृद्ध आहेत. प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत.
वास्तविक, मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याचवेळी वृत्तवाहिन्यांवर काही व्हिडिओ दाखवण्यात आले, ज्यात मनमोहन सिंग बेडवर पडलेले दिसत आहेत आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर त्यांच्या शेजारी उभ्या आहेत.
दमन म्हणाल्या, “माझे वडील एम्समध्ये डेंग्यूवर उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. आम्ही संसर्गाच्या धोक्यामुळे येणाऱ्यांना प्रतिबंधित केले आहे. आरोग्यमंत्र्यांचे येणे आणि आमच्याबद्दल काळजी असल्याचे दाखवणे चांगले वाटले. तथापि, माझे आई-वडील त्या वेळी फोटो काढण्याच्या स्थितीत नव्हते. माझ्या आईने आग्रह केला की छायाचित्रकाराने खोली सोडली पाहिजे, परंतु त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर ती खूप अस्वस्थ होती.”
या प्रकरणावर डॉक्टरांनी म्हटले की, रुग्णांची प्रायव्हसी राखणे ही नैतिकता आहे, जी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शिकवली जाते. रुग्णाच्या गोपनीयतेचे रक्षण करण्याची जबाबदारी डॉक्टर आणि रुग्णालयांची आहे. फोरम फॉर मेडिकल एथिक्स सोसायटीच्या (एफएमईएस) सदस्याने सांगितले की, जर माजी पंतप्रधानांचे फोटो त्यांच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय काढले गेले तर ते नैतिकतेचे उल्लंघन आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी ट्विट करून म्हटले की, हे मीडियाच्या मथळ्यांसाठी केले गेले आहे, जे निंदनीय आहे. अशा अनेक प्रतिक्रियांनंतर मंडावियांनी ते फोटो हटवले. डॉक्टर आणि एम्स व्यवस्थापनाने छायाचित्रकाराला आत कशी परवानगी दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे एम्सचे संचालक गुलेरिया स्वतः तिथे उपस्थित होते.
Ex PM Manmohan Singh Daughter Daman Singh Reaction After Her Father Photos Viral On Social Media
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App