विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी माजी आमदार आणि दिग्गज नेते अंबरीश डेर यांनीही पक्ष सोडला.Ex-Gujarat Congress President Quits Party, Modhwadia Says – Party Insulted Shri Ram By Rejecting Pranpratistha’s Invitation
पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन मोधवाडिया हे देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसचे केवळ 14 आमदार शिल्लक राहिलेले आहेत. याआधी सीजे चावडा आणि चिराग पटेल यांनीही आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मोधवाडिया म्हणाले, ‘जेव्हा एखादा पक्ष जनतेशी संपर्क तोडतो, तेव्हा तो पक्ष जास्त काळ टिकू शकत नाही. राम मंदिर व्हावे, अशी देशातील जनतेची इच्छा होती. सर्वोच्च न्यायालयाकडून घटनात्मक निर्णय आल्यानंतर काँग्रेसनेही त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तरीही प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण नाकारले. असे करून पक्षाने रामाचा अपमान केला.
तेव्हाही मी आवाज उठवला होता की यामुळे जनभावना दुखावल्या जातील आणि आपण असे राजकीय निर्णय घेऊ नयेत आणि या निर्णयातून जनतेशी असलेला संबंधच दिसत नाही. इतर अनेक बाबींमध्येही मी माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळू शकले नाही. यामुळे अखेर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App