रडतानाचा व्हिडिओ व्हायरल; आपल्यातील नाते संपल्याचे केले जाहीर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये नातेसंबंध तयार होतात आणि तुटतात, यावेळी 17 व्या सीझनमध्ये कॉमेडियन मुनव्वर फारुकी सर्वात लोकप्रिय स्पर्धक बनला आहे. संपूर्ण सीझनमध्ये धमाकेदार मनोरंजन देणारा फारुकीचा शो आता हळूहळू अडकताना दिसतोय.Ex girlfriend Nazila calls Bigg Boss fame Munawwar Farooqui a rookie
मुनव्वरच्या लव्ह लाईफबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता त्याची आणखी एक एक्स गर्लफ्रेंड नझिला हिने लाइव्ह व्हिडिओमध्ये मुनवर फारुकीवर गंभीर आरोप केले आहेत. इन्स्टाग्रामवर नझिला सिताशीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती मुनव्वर फारुकी याच्यावर अनेक अफेअर आणि फसवणुकीचे आरोप करत आहे.
नझिलाने इंस्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओद्वारे मुनव्वर फारुकीचा खुलासा केला आहे. चाहत्यांशी बोलत असताना तिला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कॅमेऱ्यासमोर ती रडू लागली. नाझिलाने मुनव्वर फारुकीसोबत ब्रेकअपची घोषणा केली आणि ती पॅचअप करू शकणार नाही, असे सांगत नझिलाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
View this post on Instagram A post shared by R♡ 🦋✨ (@editsyoulovee._)
A post shared by R♡ 🦋✨ (@editsyoulovee._)
यात आयशा व्यतिरिक्त इतर मुलींचाही सहभाग असल्याचा खुलासा त्यांनी केला. नझिला म्हणाली की ती एपिसोड येण्याची वाट पाहत आहे जेणेकरुन तिला सत्य कळू शकेल; मात्र, बिग बॉस 17 च्या एपिसोडनंतर मुनव्वर फारुकी याने खरे सांगितले असेल असे तिला वाटत नाही. त्यामुळेच तिने लाईव्ह येऊन सत्य सांगितले.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर नजिला म्हणाली की मुनव्वरच्या बोलण्याने तिला खूप दु:ख झाले आहे. टेलिव्हिजनवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत आहे. बिग बॉसमध्ये सुरू असलेल्या नाटकाबद्दल तिने खंत व्यक्त केली आणि मला त्यात पडायचे नाही असे सांगितले. ती म्हणाली की मुनव्वरसोबतच्या जुन्या नात्याबद्दल ती शेवटचीच बोलत आहे. यावेळी नझिलाने दोघांमधील गोष्टी संपल्याचे आणि तिला पुढे जायचे आहे, त्याबद्दल पुन्हा कधीही बोलायचे नाही, असे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App