वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महात्मा गांधींची सगळी हयात हिंदू धर्म समजण्यात गेली. तरीही त्यांना गोडसेंनी का मारले? कारण त्याची विचारसरणी खरी हिंदू नव्हती. संघ – भाजप खरे हिंदू नाहीतच, अशी बेछूट टीका काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.Even though Mahatma Gandhi’s life was considered Hinduism, why did Godse kill him ?; Because Sangh-BJP are not real Hindus !!
महिला काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त ते बोलत होते. त्यांचे सगळे भाषण संघ – भाजपवर बेछूट टीका करण्यात गेले. महिला काँग्रेसचा नेमका कितवा वर्धापन दिन आहे हे देखील राहुल गांधी विसरले. राहुल गांधी म्हणाले, की महात्मा गांधींची सगळी हयात हिंदूधर्म समजण्यात गेली. परंतु तरीही त्यांना गोडसेने मारले ते का मारले हे समजून घेण्याची गरज आहे.
संघ – भाजप स्वतःला हिंदू पार्टी म्हणतात. परंतु ते खरे हिंदू पार्टी नाहीत. ते जातील तिथे लक्ष्मी, दुर्गा यांना मारतात. स्वतःला हिंदू म्हणवून घेतात पण ते धर्माची दलाली करतात, असा बेछूट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महिला काँग्रेसचा अडतिसावा वर्धापन दिन असताना राहुल गांधी आपल्या भाषणात महिला काँग्रेस गेली 25 वर्षे कार्यरत आहे असे म्हणाले. स्टेजवरील महिला नेत्यांना त्यांची चूक लक्षात आणून द्यावी लागली. राहुल गांधींनी आपले सर्व भाषण भाजप आणि संघ यांच्यावर टीका करण्यात खर्ची केले.
काँग्रेसची विचारधारा या विषयावर त्यांनी जाता जाता स्पर्श केला. पण भाषणातले मुख्य मुद्दे संघ – भाजप वरच्या टीकेचेच होते. काँग्रेसच्या आणि गोडसे सावरकरांच्या विचारधारेत मूलभूत फरक असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App