पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींपैकी दोघांना अटक केली
विशेष प्रतिनिधी
नर्मदापुरम : मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर मध्य प्रदेशातील पोलीस आणि प्रशासन चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ताजे प्रकरण मध्य प्रदेशातील नर्मदापुरमचे आहे. दोन दिवसांपूर्वी एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या बातमीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. Even in the Mohan Yadav government Yogi model bulldozer on the house of gang rape accused
आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. नर्मदापुरमच्या बीटीआय परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारातील चारपैकी दोन आरोपींच्या ‘बेकायदेशीर घरावर’ बुधवारी प्रशासनाने बुलडोझर फिरवले.
वास्तविक, नर्मदापुरमच्या बीटीआय परिसरात काल एका मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती. तरुणीने मंगळवारी सायंकाळी उशीरा पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपींची घरे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली.
25-26 च्या रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मतदारसंघ असलेल्या बुधनी येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीने मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. यानंतर नर्मदापुरम पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींपैकी दोघांना अटक केली. यानंतर बुधवारी महसूल विभाग आणि पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत दोन्ही आरोपींचे बेकायदा बांधकाम बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त केले. आरोपीचे घर फोडताना नगर दंडाधिकारी संपदा सराफ, तहसीलदार देवशंकर धुर्वे, एसडीओपी पराग सैनी व पोलीस व पालिका कर्मचारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App