अमेरिकेने 25 % टेरिफ लादले तरी भारत स्वतःचेच राष्ट्रहित साधेल; परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्पना ठाणकावले!!

Trump

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर 25% टेरिफ लादले तरी भारत स्वतःचेच राष्ट्रीय हित साधेल, स्पष्ट शब्दांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. Trump

भारत रशियाकडून तेल आणि शस्त्र घेतो. रशिया युक्रेन विरुद्धचे युद्ध थांबवत नाही, तरी भारत रशियाबरोबरचा व्यापार थांबवत नाही, असे कारण दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ लादायची घोषणा केली. हा टेरिफ 1 ऑगस्ट 2025 पासून लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण याचा परिणाम भारतावर लगेच होणार नसल्याचे मत भारतीय अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.

पण याच दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ वरल्या पोस्टची दखल घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले.

भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय मुक्त व्यापाऱ्याचा करार होणे अपेक्षित असताना त्या संदर्भातल्या वाटाघाटी सुरू आहेत पण भारत स्वतःच्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि छोट्या मोठ्या उद्योगांचे हित प्रथम पाहील त्यामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही. भारत आणि ब्रिटन बरोबर द्विपक्षीय मुक्त व्यापार करार केला. त्यावेळी देखील भारताने दोन्ही देशांना आर्थिक दृष्ट्या हितकारक ठरणारीच भूमिका घेतली. तीच पुढच्या सर्व करारांना लागू असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांना सुनावले.

Even if America imposes 25% tariff, India will pursue its own national interest; Ministry of External Affairs slams Trump!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात