कामगारांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारचा दिलासा, ईएसआयसी योजनेतून मृतांच्या पत्नीला निवृत्तीवेतन

विेशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. विमाधारक कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास पत्नीला निवृत्तीवेतन मिळणार आहे. ESIC will help corona affected families

या विम्यासाठी काही सोप्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोविड रोगाने मृत्यूचे निदान होण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर विमा उतरवलेल्या व्यक्तींनी ईएसआयसी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी एका वर्षाच्या कालावधीत कामगार किमान ७८ दिवसांसाठी तो वेतनावर नियुक्त असावा.



ईएसआयसी योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी अशा व्यक्तींनी जर कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी आणि त्या रोगामुळे मृत्यू होण्याआधी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये नोंदणी केली असल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांना फायदा मिळेल. श्रम व रोजगार मंत्रालय ईएसआयसी व ईपीएफओ योजनांच्या माध्यमातून अतिरिक्त फायदे देणार आहे. ईएसआयसी अंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींसाठी नोकरीच्या ठिकाणी दुखापतीमुळे मृत्यू झाल्यास किंवा विमा उतरवलेली व्यक्ती काम करण्यास अक्षम झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या सरासरी दैनंदिन मजुरीच्या ९० टक्के निवृत्तीवेतन त्याच्या पत्नीला आणि आईला आयुष्यभरासाठी आणि मुलांना त्यांच्या वयाच्या पंचवीशीपर्यंत दिली जाईल. मुलींना त्यांच्या लग्नापर्यंत हा लाभ मिळेल.

ESIC will help corona affected families

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात