कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : EPFO भविष्य निर्वाह निधी क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत ईपीएफओने इतिहास रचला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ५ कोटींहून अधिक दावे निकाली काढले आहेत जो एक विक्रम आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे.EPFO
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पहिल्यांदाच ५ कोटींहून अधिक दावे निकाली काढून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, ईपीएफओने २,०५,९३२.४९ कोटी रुपयांचे ५.०८ कोटी दावे निकाली काढले आहेत, जे २०२३-२४ या आर्थिक वर्षात १,८२,८३८.२८ कोटी रुपयांच्या ४.४५ कोटी दाव्यांपेक्षा खूपच जास्त आहे.
कामगार मंत्री म्हणाले की, दाव्याच्या निपटारा प्रक्रियेत आणि तक्रारींचे निवारण करण्यात आलेल्या परिवर्तनकारी सुधारणांमुळे ईपीएफओने हे यश मिळवले आहे. मनसुख मांडविया म्हणाले की, आम्ही ऑटो सेटलमेंट दाव्यांची मर्यादा आणि श्रेणी वाढवणे, सदस्य प्रोफाइलमधील बदल सोपे करणे, भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि केवायसी अनुपालन प्रमाण सुधारणे अशी पावले उचलली आहेत. या सुधारणांमुळे, ईपीएफओची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App