आदित्य ठाकरे यांना ममतांच्या भेटीला पाठवत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांबद्दलच्या “काळजीयुक्त” चर्चेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेय का??

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांबद्दल “काळजीयुक्त” चर्चा करणार्‍यांना न बोलता राजकीय कृतीतून उत्तर दिले आहे काय??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.Environment Minister Aditya Thackeray meets West Bengal Chief Minister Mamata Banerjee

उद्धव ठाकरे यांची मणक्याची शस्त्रक्रिया झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री नेमला पाहिजे, अशा चर्चेचे पिल्लू सोडून देण्यात आले होते. मीडियातील काही विशिष्ट सेक्शनमधून हे चर्चेचे पतंग उडविण्यात आले होते. त्यातही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार… म्हणजे शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करणार अशा बातम्या देखील या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चर्चेच्या निमित्ताने पसरविण्यात आल्या. मीडियातील विशिष्ट सेक्शनने त्या बातम्यांना उचलून धरले होते.


ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, त्रिपुरातील हिंसाचार आणि बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार


त्यावेळी उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. शिवसेनेकडून या बातम्यांचा फारसा प्रतिवाद करण्यात आला नाही. पण आज जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव भेट घेऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट झाले त्यानंतर शिवसेनेच्या वतीने ममतांना कोण भेटणार?, हा प्रश्न उपस्थित झाला. त्याला उद्धव ठाकरे यांनी न बोलता कृतीतून उत्तर दिले आहे. आपल्या ऐवजी शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे हे ममता बॅनर्जी यांना भेटतील, असे मुक्रर करण्यात आले आहे. आज रात्री आठ वाजता ही भेट होणार आहे, असे सांगितले गेले.

याचा राजकीय संदेश शिवसेनेत स्पष्ट आहे. शिवसेनेतला नंबर 2 पक्का आहे. पण त्याचबरोबर ज्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणूक या निमित्ताने ज्या “काळजीयुक्त” चर्चा घडविल्या त्यांना हे न बोलता दिले गेलेले प्रत्युत्तर आहे का?? मुख्यमंत्रिपद तर शिवसेना सोडणार नाहीच, पण काळजीवाहू मुख्यमंत्री नेमायचा झालाच तर तो कोणाला नेमता येईल??, याचे उत्तर सूचकपणे आदित्य ठाकरे यांना पुढे करून देण्यात आले आहे का?? याविषयी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत हे जरी आदित्य ठाकरे यांच्या बरोबर असले तरी देखील आदित्य ठाकरे हेच शिवसेनेच्या वतीने ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत हे येथे अधोरेखित केले पाहिजे.

Environment Minister Aditya Thackeray meets West Bengal Chief Minister Mamata Banerjee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात