वृत्तसंस्था
चंदिगड : Punjab Police पंजाबमधील बटाला येथे दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जतीन कुमार उर्फ रोहन हा दहशतवादी जखमी झाला. या मॉड्यूलच्या एकूण ६ इतर दहशतवाद्यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.Punjab Police
शस्त्रास्त्रे जप्त करण्यासाठी नेले जात असताना, दहशतवादी जतिनने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी कारवाई केली. जखमींना बटाला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती स्वतः डीजीपी गौरव यादव यांनी दिली. या कारवाईत सहा बीकेआय दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये जतिन कुमार उर्फ रोहन, बरिंदर सिंह उर्फ सज्जन, राहुल मसिह, अब्राहम उर्फ रोहित, सोहित आणि सुनील कुमार यांच्या नावांचा समावेश आहे.
नेटवर्क परदेशातून चालत होते
हे मॉड्यूल पोर्तुगालस्थित मनिंदर बिल्ला आणि मन्नू अग्वान यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानच्या आयएसआयच्या आदेशानुसार चालवले जात होते, ज्यांनी अलीकडेच खलिस्तान समर्थक संघटना बीकेआयची कमान स्वीकारली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी अलिकडेच बटाला येथील एका दारूच्या दुकानाबाहेर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी ३० बोरचे पिस्तूलही जप्त केले.
UAPA च्या कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणात, बटाला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (BNS) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील शांतता भंग करणाऱ्या दहशतवादी नेटवर्क्सना संपवण्याची कारवाई सुरूच राहील, असे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App