या विमानात एकूण १४० प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाचे मंगळवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानास आज सकाळी अचानक परतावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे कॉकपिटमध्ये फायर अलार्मचा आवाज आल्याचे सांगण्यात येत आहे. यासह अलार्मिंग लाईट लागले होते. Emergency landing of Spicejet flight at Delhi airport
फ्लाइटच्या मागे असलेल्या कार्गोला आग लागल्याने धूर निघू लागल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच स्थितीत विमान अर्ध्यातूनच परतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानात एकूण १४० प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंग दरम्यान कोणालाही इजा झाली नाही. विमानाच्या तपासणीत आग किंवा धूर ही बाब समोर आलेली नाही.
स्पाइसजेटच्या विमानाने मंगळवारी दिल्लीहून श्रीनगरला उड्डाण केले. पण कार्गोला अचानक आग लागल्याचा सिग्नल मिळताच कॉकपिटमध्ये फायर अलार्म वाजू लागला. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग दिल्लीच्या इंदिरा विमानतळावर करावे लागले. वैमानिकाच्या समजूतदारपणामुळे विमान सुरक्षितपणे उतरता आले आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर कार्गो आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र कुठेही आग किंवा धुराचे लोट दिसत नव्हते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App