दिल्ली विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; एकाच महिन्यातील दुसरी घटना!

वैमानिकाने तातडीने एटीसीला याची माहिती दिली आणि…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडिगो विमानाचे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दिल्ली-डेहराडून मार्गावरील विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.  Emergency landing of IndiGo flight at Delhi Airport

विमानात १५० प्रवासी होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान तातडीने उतरवण्यात आले. इंडीगो विमानाने दिल्लीहून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला दुपारी तीन वाजेच्या सुमारास उड्डाण केले, मात्र काही वेळाने विमान परतले.

प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे विमान दिल्लीहून डेहराडूनला निघाले असता विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. वैमानिकाने तातडीने एटीसीला याची माहिती दिली आणि प्राधान्याने लँडिंग करण्याचे आवाहन केले. त्यावर, विमान तातडीने दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानांमध्ये बिघाडाच्या घटनांमध्ये  वाढ होताना दिसत आहे. इंडिगोच्या विमानाचे उड्डाण झाल्यानंतर लगेचच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची ही याच  महिन्यातील दुसरी घटना आहे.

Emergency landing of IndiGo flight at Delhi Airport

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात