2 पायलट आणि तीन क्रू मेंबर बेपत्ता, शोध मोहीम सुरू
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाच्या ( Indian Coast Guard ) हेलिकॉप्टरने अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर दोन वैमानिकांसह तीन क्रू सदस्य बेपत्ता आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याचा मलबा जप्त करण्यात आला आहे.
सध्या बेपत्ता दोन पायलट आणि अन्य क्रू मेंबरचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सोमवारी रात्री उशिरा बचाव कार्यादरम्यान एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह चार एअरक्रू होते, लँडिंग केल्यानंतर दोन्ही पायलट बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक डायव्हर सापडला आहे. समुद्रात सापडलेल्या डायव्हरची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर बाहेर काढण्यासाठी जहाजाजवळ येत असताना ही घटना घडली. शोध मोहिमेत तटरक्षक दलाने चार जहाजे आणि दोन विमाने तैनात केली आहेत.
गुजरातमध्ये नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात तटरक्षक दलाच्या या ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने ६७ लोकांचे प्राण वाचवले होते. हे हेलिकॉप्टर सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोरबंदरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या भारतीय ध्वजाच्या मोटार टँकर हरी लीला येथे गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पोहोचले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App