साजिद खानला बिग बॉस मधून हटवा; स्वाती मालीवाल यांच्या मागणीनंतर बलात्काराच्या धमक्या; दिल्ली पोलिसात तक्रार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 10 महिलांनी ज्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे, त्या बॉलीवूडचा अभिनेता – दिग्दर्शक साजिद खानला बिग बॉस 16 सिझनमधून हटवावे, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केल्यानंतर त्यांना बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत. या संदर्भात त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दिल्ली पोलिसांनी त्याची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. Eliminate Sajid Khan from Bigg Boss; Rape threats after Swati Maliwal’s demand

साजिद खान याच्याविरुद्ध आधीच 2 अभिनेत्री आणि अन्य 8 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रींना सिनेमात भूमिका देण्यासाठी साजिद खान कपडे उतरवायला लावतो आणि तुमचे शरीर मला चांगले वाटले तर तुम्हाला मी सिनेमात काम देईन, असे सांगतो, असा आरोप स्वाती मालीवाल यांनी आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. साजिद खानला बिग बॉसच्या घरातून हाकलण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना स्वाती मालीवाल यांनी आधीच पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहिल्यानंतर त्यांना इंस्टाग्राम वर बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत. साजिद खान बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तुमच्यावर बलात्कार करेल अशा या धमक्या आहेत, असे मालीवाल यांनी सांगितले.

याच संदर्भात स्वाती मालीवाल यांनी एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये त्यांनी घटनाक्रम स्पष्ट केला आहे. साजिद खानला बिग बॉस मधून बाहेर काढण्याची मागणी करणारे पत्र मी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना लिहिले आहे. तेव्हापासून मला बलात्काराच्या धमक्या इंस्टाग्राम वर दिल्या जात आहेत. मी दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष भूषवत असल्याने माझे संविधानिक काम रोखण्यासाठी अशा प्रकारच्या धमक्या आणि कारवाया सुरू आहेत. परंतु या धमक्यांना मी घाबरणार नाही. दिल्ली पोलिसांकडे मी तक्रार केली आहे आणि ते योग्य ती कायदेशीर कारवाई करून दोषींना अटक करतील, असा माझा विश्वास आहे, असे मालीवाल यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे

साजिद खान यांच्या विरोधात 10 महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याची दखल दिल्ली महिला आयोगाने घेऊन त्याविषयीची तक्रार देखील पोलिसांकडे केली आहे.

इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन या संघटनेने एक पत्रकार आणि दोन अभिनेत्री यांनी ईमेल द्वारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन साजिद खानला 2019 मध्ये एका सिनेमाच्या दिग्दर्शक पदावरून हटवले होते. त्याचबरोबर अशा तक्रारी वाढल्यानंतर साजिद खानला हाउसफुल 4 या सिनेमाच्या दिग्दर्शनातून देखील बाजूला काढले होते.

Eliminate Sajid Khan from Bigg Boss; Rape threats after Swati Maliwal’s demand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात