तीन राज्यांमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी होणार निवडणूक, मात्र काँग्रेसच्या झोळी रिकामीच राहणार!


काँग्रेसने निवडणुकीअगोदरच शरणागती पत्कारल्याचे स्पष्ट चित्र

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की राज्यसभेच्या 10 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये कुठेही खाते उघडणार नसल्याचे दिसत आहे. 24 जुलै रोजी राज्यसभेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. गुजरात, गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये या 10 राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत, परंतु काँग्रेसने या लढतीपूर्वीच शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जुलै आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे. तर 24 जुलै रोजी मतदान होणार आहे. Elections will be held for 10 Rajya Sabha seats in three states but Congress will not be able to win a single seat

बंगाल विधानसभेत काँग्रेस शून्य –

बंगालमध्ये काँग्रेस काही करू शकेल असे वाटत नाही. कारण, पश्चिम बंगालमध्ये एकूण 6 जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. डेरेक ओब्रायन, डोला सेन, प्रदीप भट्टाचार्य, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. तर तृणमूल काँग्रेसने 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यंदा डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बडाइक आणि साकेत गोखले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बंगाल विधानसभेत काँग्रेसचे अस्तित्व उरले नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आणि त्या आमदारानेही टीएमसीत प्रवेश केला. त्यामुळे सध्या बंगाल विधानसभेत काँग्रेसचा सुपडासाफ आहे. अशा स्थितीत राज्यसभेची निवडणूक लढवण्यात काँग्रेसला काही अर्थ नाही.

बंगालमध्ये भाजपला मिळू शकते एक जागा –

बंगालमध्ये काँग्रेसला काही मिळणार नाही, पण एक जागा भाजपच्या खात्यात नक्कीच जाऊ शकते. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 सदस्य आहेत, निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या आहेत. राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणूक होत असून या संदर्भात एका जागेसाठी 43 आमदारांची मते आवश्यक आहेत. या संदर्भात, भाजप एक जागा जिंकू शकतो आणि तरीही 30 हून अधिक भाजप आमदारांची मते वाचतील.

गुजरातमध्ये तीन जागांवर निवडणूक –

गुजरातमध्ये ऑगस्टमध्ये राज्यसभेच्या 3 जागा रिक्त होणार आहेत. एस जयशंकर, जुगलजी ठाकोर आणि दिनेश अनावडिया यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपणार असून तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत, त्यापैकी 8 सध्या भाजपकडे आणि उर्वरित काँग्रेसकडे आहेत. भाजपच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी भाजपने अद्याप अधिकृतपणे उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही –

गुजरातमधील निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस राज्यसभा निवडणूक लढवणार नाही. गुजरातमधून राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार उभा करणार नसल्याचे काँग्रेसने शुक्रवारी स्पष्ट केले. याचे कारण काँग्रेसकडे विधानसभेत संख्याबळाचा अभाव आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 157 सदस्य आहेत, तर राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी त्यांना 46 आमदारांची गरज आहे. 3 जागांसाठी एकूण 138 मतांची गरज आहे, तर भाजपच्या आमदारांची संख्या त्याहूनही अधिक आहे. अशा स्थितीत काँग्रेसने निवडणूक लढवली असती तर त्यांचा पराभव निश्चित होता.

गोव्यातही काँग्रेस जिंकणार नाही –

गोव्याबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसला इथे काही मिळवायचे नाही. गोव्यात एका जागेवर राज्यसभेची निवडणूक आहे. गोव्यातील विधानसभा सदस्यांची संख्या 40 असून त्यापैकी 20 आमदार भाजपचे असून तीन अपक्षांचाही पाठिंबा आहे. मतांच्या गणितानुसार ही राज्यसभा निवडणूक फक्त भाजपच जिंकू शकते.

Elections will be held for 10 Rajya Sabha seats in three states but Congress will not be able to win a single seat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात