महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर

Maharashtra Legislative Council

मतदान आणि मतमोजणी कधी होणार जाणून घ्या? Maharashtra Legislative Council

विशेष प्रतनिधी

मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या राजकीय उलथापालथींनंतर, राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील ५ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. आयोगाने या जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या आमदारांच्या नावांमध्ये आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे.

आयोग १० मार्च रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करेल. यानंतर, १७ मार्चपर्यंत नामांकन दाखल करता येईल. अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी केली जाईल. यानंतर २० मार्चपर्यंत नामांकन मागे घेता येईल. मतदान आणि मतमोजणी २७ मार्च रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आहे. मतमोजणी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.

Elections announced for 5 vacant seats of Maharashtra Legislative Council

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात